आरोपी महिला डॉक्टरांना ‘शिक्षणबंदी’

 


डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपी महिला डॉक्टरांना ‘शिक्षणबंदी’
मुंबई/प्रतिनिधी
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रुग्णालयात तूर्तास जाता येणार नाही. रुग्णालयाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी त्यांना शिक्षण पूर्ण करण्यास तूर्तास परवानगी देण्यास नकार दिला आहे.
डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणात डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल व भक्ती मेहर या तिघी आरोपी असून, त्यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जामीन देताना नायर रुग्णालयात कधीही न जाण्याची अट घातली होती. त्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायचे असल्याने नायर रुग्णालयात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी अर्जाद्वारे मागितली होती. या तिघींनी ऍड. आबाद पोंडा यांच्यामार्फत अर्ज केला होता. आरोपींना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाहीफ, असं निरीक्षण न्यायमूर्ती साधना जाधव यांनी नोंदवून या तिघींना नायर रुग्णालयातच अन्य एखाद्या विभागात पोस्टिंग देऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू दिले जाऊ शकते का, याची माहिती देण्यासाठी न्यायमूर्तींनी नायर रुग्णालयाच्या स्त्री रोग विभागाच्या प्रमुखांना न्यायालयात बोलावले होते. दरम्यान, आजही नायर रुग्णालयात या घटनेने वातावरण चांगले नाही. 


Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...