अंतरंगातील दीप जीवन प्रकाशमान करते !
सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांचे प्रतिपादन
पनवेल: बाह्य जगात कितीही अंधकार पसरलेला असला तरी स्वतःचे जीवनमान प्रकाशित करण्यासाठी अंतरंगात ज्ञान, भक्ती, शांतता, समानता आणि सत्याचा दीप लावता आला पाहिजे. भयमुक्त जीवन आणि समाज उन्नतीकरिता संत आणि विचारवंतांच्या विवेकाची मनावर मशागत वारंवार करून घेतली की, अंधकाराची भीती वाटत नाही, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी केले.
मोहो गावात नारदीय कीर्तन परंपरेनुसार कीर्तन महोत्सव आणि दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
हभप धनाजीबुवा पाटील यांनी संत तुकोबांच्या अभंगाचा दाखला देत द्रव्याची आस न धरता कीर्तन करावे असे सुचविले होते. तो धागा पकडून कडू म्हणाले की, संत तुकोबा सत्यवचनी होते. परंतु आता कलियुगाचा इतका प्रभाव आहे की, पैसा फेकल्याशिवाय काहीच होत नाही. मतदान करताना पैसे मोजावे लागत असतील तर तुकोबांच्या मते हे समाजाच्या अधोगतीचे लक्षण मानावे लागेल.
दीपोत्सव साजरा करताना मन त्या परमात्मारुपी प्रकाशाने उजाळून निघाले पाहिजे. त्यासाठी सात्विकता पोटी उपजली पाहिजे. षडरिपुंवर ताबा जरी मिळवता आला नाही तरी माणूस म्हणून जगताना स्वतःपुरते तरी अंतरंगात दीप लावले तरी सर्वांचे जीवन आपोआप प्रकाशमान होईल आणि त्यांच्यातील ओजधातूने शांतीमय समाजाची उन्नती होत राहील. त्यासाठी काही झाले तरी भगवंताशी असलेली नाळ कधी तुटू द्यायची नाही, असे मत कडू यांनी मांडले.
दीपोत्सवात विवेकी विचारांचे तेल पुंडलिक फडके महाराज, धनाजीबुवा पाटील आणि लक्ष्मण महाराज यांनी ओतले.
कार्यक्रमासाठी समाजभूषण नामदेवशेठ फडके, नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वामन शेळके, हभप रमाकांत रसाळ, श्रीकृष्ण रसाळ, नारायण म्हात्रे, भास्कर भोईर नारायण भोईर, विलास भोईर, मिलिंद पोपेटा, हभप माया भोईर, सुरज म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे आणि महेंद्र पाटील उपस्थित होते.
अंतरंगातील दीप जीवन प्रकाशमान करते !
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...