रामदास आठवले म्हणतात, “ट्रम्प ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा मी अध्यक्ष”



रामदास आठवले म्हणतात, “ट्रम्प ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा मी अध्यक्ष”


आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधताना केलं वक्तव्य




 



“अमेरिकीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ज्या रिपब्लिकन पक्षाचे आहेत त्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे मी त्यांचे भारतात स्वागत करतो,” असे मजेशीर वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना केलं. ट्रम्प हे मंगळवारी रात्री मायदेशी परतले असले तरी आठवले यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशल नेटवर्किंगवर सुरु आहे.




कोल्हापूर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या दिव्यांग उन्नती योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मंगळवारी मदत साहित्याचे वाटप करण्यात आलं. सामाजिक न्याय मंत्री आठवले यांच्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आलं. शिवाजी विद्यापिठात पार पडलेल्या या साहित्य वाटप कार्यक्रमानंतर आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबद्दल भाष्य केलं.


पत्रकारांनी ट्रम्प यांच्या दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारला असता आठवलेंनी, “अमेरिकीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ज्या रिपब्लिकन पक्षाचे आहेत त्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे मी त्यांचे भारतात स्वागत करतो,” असं म्हणत संवाद साधण्यास सुरुवात केली. आठवलेंचे हे वक्तव्य ऐकून पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. “ट्रम्प यांचा भारत दौरा खूप महत्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त होतील,” असा विश्वास आठवलेंनी पत्रकारांच्या पुढील प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.




Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...