ॠतिक-सुजैन पुन्हा एकत्र येणार? 


ॠतिक-सुजैन पुन्हा एकत्र येणार? 
ॠतिक रोशन आणि सुजैन खान यांच्या घटस्फोटाला सहा वर्ष पूर्ण झाली. असे असले तरी यांच्यात घटस्फोटानंतरही मैत्रीचे नाते आहे. आजही दोघेजण आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसतात. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त दोघे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बी टाऊनमध्ये दोघे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. 
काल, शुक्रवारी (ता. २१) पनवेल येथील महादेवाच्या मंदिरात ॠतिक आणि त्याची एक्स पत्नी सुजैन स्पॉट झाले आहेत. मंदिरात दोघांनी शिवलिंगाची पुजा केली. दोघांसोबत कुटूंबदेखील उपस्थित होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ॠतिकची दोन मुलं रिहान आणि  रिधान, पत्नी सुजैन आणि त्याचे वडिल  राकेश रोशन असल्याचे पाहायला मिळत आहेत. 
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतील सुजैनने घटस्फोटाबाबत अनेक खुलासे केले होते. त्यामध्ये तिने सांगितले आहे की, आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे एकत्र राहणे शक्य नव्हते. त्यावेळी आम्हाला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. तसेच आम्हाला एकमेकांबद्दल जागरूक असणे आवश्यक होते. खोट्या आशेवर राहणे आम्हाला मान्य नव्हते हेच कारण घटस्फोट घेण्यामागचे होते. सध्या आम्ही दोघेजण विभक्त आहोत. पण आमच्यातील मैत्री अजूनही कायम असल्याचे सांगितले होते.
मात्र, महाशिवरात्रीनिमित्त दोघांनी केलेली शिवलिंगाची पुजा पाहुन पुन्हा दोघे एकत्र येणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. 


Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...