लहान मुलांमधील कर्करोग
कर्करोगाने आता हातपाय पसरले आहेत. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला तो होऊ शकतो. कर्करोग कोणातही भेदभाव करत नाही. अगदी लहान मुलांनाही कर्करोग होत असल्याचे आपल्या निदर्शनाला आले आहे. गेल्या 15-20 वर्षांत मुलांमधील कर्करोगांवर यशस्वी उपचार करण्यात यश येताना दिसत आहे. वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी मानली पाहिजे.
लहान मुलांमधील कर्करोगांवर यशस्वी उपचार केले जात आहेत. लहान मुलांमध्ये आढळणार्या कर्करोगांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्करोगग्रस्त मुलांवर संपूर्ण उपचार केले जात आहेतच; या व्यतिरिक्त कर्करोगाला मुळापासून उखडून टाकण्यातही यश येत आहे. काही वेळा मुलांना काही समस्या किंवा आजारांना सामोरे जावे लागते. त्याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा डॉक्टरांना असते. लहान मुलांना रोज सकाळी उलटी येऊ शकते. त्याला पालक शाळा बुडवण्यासाठीचा बहाणा म्हणून दुर्लक्ष करतात किंवा अगदी खूप लहान वयाच्या मुलांना पायात वेदना होत असल्याने त्यांना चालता येत नाही. थोडा थोडा वेळाने मूल कडेवर घेण्याचा आग्रह करत असते. पालक मात्र बराच काळ मुलांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात; परंतु मुलांमध्ये सातत्याने अशी लक्षणे दिसत असल्यास त्यावर उपचार करूनही 15 दिवसांनंतरही मुलांमध्ये अशी लक्षणे सतत दिसत राहिल्यास आणि महत्त्वाचे म्हणजे, अशा वेदना होण्यासाठी काही विशेष कारणही नसेल तर केवळ मुलांचा बहाणा या नावाखाली मुलांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. कारण, मुलांमध्ये ही लक्षणे ब्रेन ट्युमर किंवा हाडांच्या कर्करोगाचीही असू शकतात. त्यामुळेच पालकांनी अतिदुर्लक्ष न करता आँकोलॉजी विशेषज्ज्ञाशी संपर्क करावा. मुलांची योग्य तपासणी करून निदान झाल्यास आणि त्यावर योग्य उपचार झाले तर कर्करोगासारख्या गंभीर आजारापासूनही बचाव करता येऊ शकतो.
कर्करोगाची लक्षणे ओळखणे कठीण असते. त्यातही मुलांमध्ये ही लक्षणे ओळखणे कठीणच आहे. कारण, अगदी साध्या आजाराप्रमाणे ही लक्षणे असतात. तरीही काही लक्षणांच्या आधारे आपण सतर्क राहून त्याचे वेळीच निदान करू शकतो.
लहान मुलांमधील कर्करोग
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...