आकाशात तारे किती?
राजवाड्याच्या गच्चीवर बसून एके रात्री बादशहा व बिरबल गप्पा मारत होते. तेवढ्यात बादशहा बिरबलला म्हणाला, बिरबल, या आकाशात किती तारे असतील बरे?
यावर बिरबलने जवळच उभ्या असलेल्या एका सेवकाला एक परातभर मोहर्या घेऊन येण्याचा हुकूम केला. सेवक जाताच आकाशाकडे पाहत बिरबल आपण जसे काही तारेच मोजीत आहेत, असे नाटक करू लागला.
थोड्या वेळाने मोहर्या भरलेली परात आणून ती सेवकाने बिरबलाच्या पुढे ठेवली. मग तारे मोजण्याचे नाटक बंद करून ती परात बादशहापुढे ठेवीत तो म्हणाला, खाविंद, जेवढ्या मोहर्या या परातीत आहते, बरोबर तेवढेच तारे या आकाशात आहेत. नेमके तारे किती आहेत, हे माहिती करून घ्यायचे असेल, तर या परातीतील एकेक मोहरी मोजीत, अशा सर्व परातभर मोहर्या मोजीत बसा, म्हणजे तुम्हाला तार्यांची संख्या समजेल.
यावर बादशहा म्हणाला, बिरबल, त्याची काहीच गरज नाही. केवळ या मोहर्या मोजीत मला माझे उरलेले आयुष्य खर्च करायचे नाही.
आकाशात तारे किती?
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...