चार महिन्यांचे मूल आंदोलनात जातं का?

चार महिन्यांचे मूल आंदोलनात जातं का?
नवी दिल्ली/प्रतिनिधी
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआसरीविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनात चार महिन्याच्या मुलाच्या झालेल्या मृत्यूवरून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या मुलाच्या मृत्यूची स्वत:च दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच चार महिन्यांचे कुठले मूल स्वत:हून आंदोलनाला जाते, ते आम्हाला सांगा असा सवालही विचारला आहे. आंदोलनादरम्यान मुलाचा मृत्यू होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले. 


Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...