सुनील कुमारने पूर्ण केले भारताचे २७ वर्षांचे स्वप्न
आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपच्या ग्रीको रोमन गटात प्रथमच सुवर्णपदक पटकावले
नवी दिल्ली/वृत्तसंस्था
सुनील कुमारने मंगळवारी ८७ किलो वजन गटाच्या फायनलमध्ये किर्गिस्तानच्या अजान सालिदिनोव्हचा ५-० ने पराभव करीत भारताला आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपच्या ग्रीको रोमन गटात २७ वर्षांत प्रथमच सुवर्णपदक पटकावून दिले.
उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतर विजय मिळविणार्या सुनीलने येथील केडी जाधव इनडोअर स्टेडियममध्ये ८७ किलो वजनगटाच्या फायनलमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सहज मात केली. त्याआधी, सुनीलने कजाखस्तानच्या अजामत कुस्तबायेवविरुद्ध उपांत्य फेरीत १-८ ने पिछाडीवर पडल्यानंतर सलग ११ गुण मिळवत दमदार पुनरागमन केले व १२-८ ने सरशी साधत अंतिम फेरीत धडक मारली. त्याने २०१९ मध्येही या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
त्यावेळी त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याआधी, अर्जुन हालाकुर्की (५५) याने उपांत्य फेरीत चांगल्या स्थितीत असतानाही सामना गमावला. त्याला इराणच्या पौया मोहम्मद नासेरपौरविरुद्ध ७-८ ने पराभव स्वीकारावा लागला. मेहर सिंगला अंतिम चारच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. कोरियाच्या मिंसेओक किमने त्याचा ९-१ ने पराभव केला. दिवसाच्या पहिल्या पात्रता फेरीच्या लढतीत साजनला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताच्या आशेला धक्का बसला.
सुनील कुमारने पूर्ण केले भारताचे २७ वर्षांचे स्वप्न
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...