महाराष्ट्रात 63 जणांना कोरोनाची लागण: आरोग्यमंत्री राजेश टोपे


महाराष्ट्रात 63 जणांना कोरोनाची लागण: आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई/प्रतिनिधी
जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस देशभर पसरु लागला आहे. कोरोना व्हायरसच्या कचाट्यात देशातील 20 राज्य अडकली आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 52 होता, जो आज वाढून 63 वर पोहोचला आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत, तर एक रुग्ण पुण्यातील आहे.
नवीन 11 रुग्णांपैकी 8 जण परदेशातून आले होते, तर तीन रुग्णांना थेट संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावं आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
मुंबई, पुण्यातून बाहेर जाणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. जेणेकरून सध्या रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी कमी होईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. लोकं कामानिमित्त बाहेर पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लोकं बाहेर पडणार नाहीत यासाठी, काही सेवा बंद करण्यावर सरकारने भर दिला, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.


कोरोना बाधित रुग्ण
पिंपरी चिंचवड मनपा : 12           पुणे मनपा : 10
मुंबई : 21                                नागपूर : 4
यवतमाळ : 3                           नवी मुंबई : 3
कल्याण : 3                             अहमदनगर : 2
रायगड : 1                               ठाणे : 1
उल्हासनगर : 1                         औरंगाबाद : 1
                        रत्नागिरी : 1


 


Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...