माणगावात कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र शुकशुकाट 


माणगावात कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र शुकशुकाट 


माणगाव/सलीम शेख
कोरोना व्हायरसच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केंद्र सरकारने रविवारी (ता. 22) पुकारलेल्या जनता कर्फ्यूला माणगाव शहरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला शहरातील अत्यावश्यक औषधांची दुकाने रुग्णालय वगळता इतर सर्वच दुकाने शंभर टक्के बंद होती माणगाव शहर हे मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे दर दिवशी या ठिकाणी लोकांची काहीना काही कामानिमित्त गर्दी असते. 
मात्र, रविवारी माणगावात कोरोनाच्या  पार्श्‍वभूमीवर जनता कर्फ्यूमुळे सर्व शुकशुकाट होता वाहने देखील माणगावात बंद ठेवण्यात आली होती या पार्श्‍वभूमीवर  माणगाव नगरपंचायत हद्दीत तसेच तालुक्यातील सर्वच गावातुन उपविभागीय पोलिस अधिकारी माणगाव शशिकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली चोख  पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तालुक्यातील मोर्बा, साई, गोरेगाव, इंदापूर, निजामपूर, लोणेरे, टेमपाले  यांसह सर्वच  गावातून जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळाला.


 


Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...