तीन मच्छिमार नौका जळून खाक


राजपुरी कोळीवाडा येथील तीन मच्छिमार नौका जळून खाक; लाखोंचे नुकसान
मुरुड/प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील राजपुरी कोळीवाडा येथील उभ्या स्थितीत असलेल्या तीन मच्छिमार नौका मध्यरात्री 2 च्या सुमारास अचानक आग लागून भस्मसात झाल्या आहेत. या घटनेची नोंद मुरुड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.
राजपुरी कोळीवाड्यातील चंद्रकांत बाळोजी आंबेकर यांची ‘धनसागर’ नौका तसेच पद्मा बाळोजी दिघीकर यांच्या मालकीची ‘सागरकन्या’ नौका सहा सिलेंडरची होती व तिसरी नौका गोविंद केशव मढवी दोन सिलेंडरची होती.
या तिन्ही जळालेल्या नौकांपैकी दोन सिलेंडरच्या नौकेचे इंजिन घटनास्थळी दिसत आहे. उर्वरित दोन नौकांचे इंजिन घटनास्थळी दिसत नाहीत. होळीच्या सणानिमित्त आलेले कोळी बांधव सण साजरा करण्यात मग्न होते, त्या मध्यरात्री सर्व झोपलेल्या अवस्थेत असताना अचानक रात्री 2 च्या सुमारास बोटींना आग लागली. त्यावेळी जवळपास असलेल्या मुस्लिम बांधवांनी कोळी बांधवांना या घटनेची माहिती दिली. आगीची तीव्रता अधिक असल्याने नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला दुरध्वनी वरून संपर्क साधून कळविले होते. तरी सुध्दा अग्निशमन बंब उपलब्ध झाला नाही.


Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...