रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवल्याची मनोरूग्णाने केली ‘गंमत’
पनवेल/गौरव भगत
पनवेल उपनगरीय रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवल्याची पुडी सोडणार्या कामोठे येथील तरूणाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शहर पोलिस, महापालिका अग्नीशमन दल, बॉम्ब शोधक पथक, बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वान पथक कामाला जुंपले खरे पण ती केवळ एका मनोरूग्णाने केलेली गंमत ठरली आणि सार्यांचाच जीव भाड्यांत पडला.
आज सकाळी कामोेठे येथे राहणारा जगन्नाथ काशिनाथ शेट्टी नावाच्या तरूणाने पनवेल उपनगरीय स्टेशन मास्टरच्या कार्यालयात घुसून आतून दरवाजा लावून घेतला.
त्यानंतर आपण फलाट क्रमांक एकच्या रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे त्यांने सांगितले. त्याच्या त्या संशयित वर्तनामुळे रेल्वेसह पोलिस, रेल्वे पोलिस, सुरक्षा रक्षक दल, महापालिका अग्नीशमन दल, बॉम्ब शोधक पथक, निकामी करणारे पथक, श्वान पथकाने रेल्वे स्टेशनचा ताबा घेऊन तपासणी केली, मात्र हाती काहीच लागले नाही. अखेर तो तरूण मनोरूग्ण निघाल्याने रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला आई-वडीलांच्या ताब्यात दिले.
रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवल्याची मनोरूग्णाने केली ‘गंमत’
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...