स्वतःचा जीव धोक्यात घालत परिचारिकांची ‘रुग्ण सेवा’


स्वतःचा जीव धोक्यात घालत परिचारिकांची ‘रुग्ण सेवा’
कोरोना व्हायरस: पेणमधील सहाही संशयित रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’
पेण/प्रतिनिधी
राज्यात सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची धास्ती निर्माण झालेली आहे. या बिकट परिस्थितीत आरोग्य यंत्रणेत महत्त्वाचा घटक असलेल्या परिचारिका मोठ्या धैर्याने रुग्णसेवा करत आहेत. रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांबरोबर परिचारिका देखील पेण येथील सरकारी रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाची काळजी घेत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काम परिचारिका करत आहेत. एका दृष्टीने आमच्यासाठी ही युद्धजन्य परिस्थिती असल्याचे परिचारिकेने सांगितले.
पेण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. रायगड जिल्ह्यात 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला आहे. पेण तालुक्यात एकही रुग्ण अद्याप आढळला नाही. परंतु कोरोना संशयित 6 रुग्णांना उम्बर्डे येथील विलगीकरण कक्षात ठेवले होते. मात्र, त्यांच्या हातावर आज होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी सोडले आहे.
सरकारी उपजिल्हा रुग्णालयात रोज 350 ते 400 रुग्ण दररोज येत असतात. यात सर्दी, खोकला, अंगदुखी आणि वायरल इंफेक्शन असणारे रुग्णांची संख्या मोठी असते. असे असले तरी सध्या सरकारी रुग्णालयातील सर्वसामान्य नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. अनेकवेळा इतर उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईक देखील उपजिल्हा रुग्णालयाकडे फिरकत नाहीत. अशा परिस्थितीत पेण उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्‍या परिचारिका ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काम करत असल्याचे चित्र पेण उप जिल्हा रुग्णालयात पहायला मिळाले. पेण उपजिल्हा रुग्णालयाचे सहायक अधीक्षक डॉ. रमेश गिरके यांनीही दुजोराही दिला.
आम्हाला आरोग्य विभागाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशा बिकट परिस्थितीत स्वतःची काळजी घेत रुग्णावर उपचार व रुग्णसेवा कशी करायची, याचे आम्हाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. सध्या कोरोना विषाणूची भीती आहे. मात्र, आम्ही स्वतः सर्व काळजी घेत आहोत. ही परिस्थिती आमच्यासाठी युध्दजन्य परिस्थिती आहे, असे यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी सांगितले. आरोग्य यंत्रणेचा कणा असलेल्या राज्यभरातील परिचारिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...