कोविडवर मात करून आजीबाई सुखरूप घरी परतल्या!

कोविडवर मात करून आजीबाई सुखरूप घरी परतल्या!


कांतीलाल कडू यांच्या विनंतीनंतर डॉक्टरांनी दिली 22 हजाराला सुट


पनवेल/प्रतिनिधी
 कोविडबाधित आजीबाईंवरील खासगी रूग्णालयाच्या बिलाचा आकडा सव्वा लाखाच्या घरात गेल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी संबंधित डॉक्टरांना विनंती करताच 22 हजाराचे बिल माफ करण्यात आले आहे. खांदा कॉलनीत राहणार्‍या आजीबाईंच्या नातेवाईंकांनी कडू यांचे आभार मानले आहेत.



 गेल्या नऊ दिवसांपासून आजीबाई कामोठे येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होत्या. तेथील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी आजीबाईंची खबरदारी घेत उपचार केले.



 कोविडमुळे आधीच सर्वत्र भीतीचे वातावरण असताना आजीबाईंना कोविड झाल्याने त्यांचे कुटूंबियसुद्धा काळजीतच होते. डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये समन्वय होताच. परंतु, सव्वा लाख रूपये बिल आल्यानंतर नातेवाईकांनी थेट पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्याशी संपर्क साधला. कडू यांनी हॉस्पीटलच्या डॉक्टरांना संपर्क साधून अतिशय नम्रपणे विनंती करत बिलाच्या रकमेत सुट देण्यास सांगितले.



 डॉक्टरांनी कोणतेही आडेवेडे न घेता, त्वरीत कडू यांच्या शब्दाला होकार दिला आणि 22 हजार रूपयांची सुट देण्यात आली. आजीबाईंच्या नातेवाईकांना मोठा दिलासा ठरल्याने त्यांनी कडू यांचे आभार मानले.


Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...