कचर्‍याचे ढीग पेटवून लावली जाते विल्हेवाट


कचर्‍याचे ढीग पेटवून लावली जाते विल्हेवाट
कामोठे नागरिकांच्या ‘नशिबी’ कचर्‍याचे प्रदुषण
 कामोठे/प्रतिनिधी
 महापालिका क्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी शंभर कोटी रूपयांचा ठेका दिला असला तरी कचर्‍यांची जागीच विल्हेवाट लावण्याच्या घटनांमुळे कामोठे शहरात प्रदुषणाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
 पनवेल महापालिकेने कचरा उचलून व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचा ठेका खासगी ठेकेदाराला दिला आहे. परंतु, तरीह स्वच्छतेचे बारा वाजल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. त्यात कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडवर घेऊन जाण्यापेक्षा मोकळ्या जागी त्या ढिगार्‍याला आग लावून मोकळे होण्याच्या घटना वाढल्या आहेच त्याचा त्रास कामोठे येथील नागरिकांना होत आहे.
 


Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...