ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे, शिक्के वापरल्याने कर्जतमध्ये खळबळ
टेम्बरे ग्रामपंचायतीतील धक्कादायक प्रकार; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील टेंम्बरे ग्रामपंचायतीमधील एका फार्महाऊस मालकाने ग्रामपंचायतीची कागदपत्रे आणि शिक्के बनविले असल्याचे उघड झाले आहे. घरपट्टी आकारण्यासाठी आल्यानंतर संबंधित कागदपत्रे बोगस असल्याचे टेंम्बरे ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्याने ग्रामपंचायतीने सर्व बोगस कागदपत्रांची चौकशी करावी, अशी तक्रार कर्जत येथे पोलीस उपअधीक्षकांना केली आहे.
टेंम्बरे ग्रामपंचायतीमधील शिंगढोळ येथे जमिनीवर शासनाची कोणतीही परवानगी न घेता घराचे बांधकाम करण्यात आले. संबंधित जमीन बिनशेती न करता जमिनीवर बांधकाम केले गेले होते, मात्र त्या ठिकाणी बांधकाम पूर्ण करणारे सुनील माणिक पाटील हे ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी आकारून घेण्यासाठी 5 फेब्रुवारी 2020 रोजी ग्रामपंचायत कार्यलयात गेल्यानंतर खरी माहिती समोर आली आहे. घरपट्टी आकारून मिळण्यासाठी पाटील यांनी जी कागदपत्रे दिली होती, त्यात वीज घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आणि घराचे असेसमेंट देखील होते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयामधील कर्मचारी देखील संभ्रमित झाले. कारण, कोणत्याही बांधकामाचे असेसमेंट आकारण्यात आल्यानंतर घरपट्टी देखील त्याचवेळी आकारली जाते. परंतु पाटील यांच्याकडे आधीच असेसमेंट उतारा होता.
ग्रामपंचायत कर्मचार्यांनी ही बाब सरपंच दीपाली पिंगळे यांच्यासमोर ठेवली. त्यावेळी काहीतरी चुकीचे झाले आहे असा संशय आल्याने घरपट्टी मागायला आलेले पाटील यांच्याकडून ग्रामपंचायतीने घर बांधकाम करण्याची परवानगी मागितली. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील बिनशेती परवानगी मागितली. पण अशी कोणतीही कागदपत्रे सुनील माणिक पाटील यांच्याकडे नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायतीचे बोगस लेटरहेड, बनावट शिक्के बनवून आणि असेसमेंट उतारा, वीज घेण्यासाठी ना हरकत दाखला तयार केला गेला आहे.
ही बाब गंभीर असल्याने आणि ग्रामपंचायतीचे शिक्के, कागदपत्रे बोगस बनवून फसवणूक करणारे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय टेंम्बरे ग्रामपंचायतने याबाबत घेतला.
त्यानुसार उप विभागीय पोलिस अधिकार्यांच्या कर्जत येथील कार्यालयात जाऊन रजपे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपाली पिंगळे, उपसरपंच संतोष निलधे, ग्रामसेवक गणेश सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गजानन शिद यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली आहे. ग्रामपंचायतीचे शिक्के आणि लेटर हेड बोगस बनवून चुकीचे प्रकार घडले असल्याने कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे.
ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे, शिक्के वापरल्याने कर्जतमध्ये खळबळ
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
धान्यात 'सरकारी भेसळ' पांढर्या तांदळाने गरिबांच्या पोटाला पडला ‘चिमटा’ पनवेल/निर्भीड लेख वृत्त सरकारी धान्यात मिसळण्यात आलेल्या कृ...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...