‘निसर्ग पर्यावरण मित्र 2020’ पुरस्काराने सुरभी स्वयंसेवी संस्था सन्मानित
अलिबाग/प्रतिनिधी
सुरभी संस्थेला राज्यस्तरीय निसर्ग पर्यावरण मित्र पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व माजी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते दौंड-पुणे येथे सुप्रिया जेधे, शितल रणसिंग, प्रतिक्षा रणसिंग व संचालक मंडळ यांना देण्यात आला. स्व. रोहिणी जाधव स्मारक ट्रस्ट, दौंड या संस्थेच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक संस्थाना पर्यावरण व रक्तदाते एडस् जनजागृती संस्था यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भिकार्यांचे डॉक्टर डॉ. अभिजीत व डॉ. मनिषा सोनावणे, मुक्तांगण संस्था पुणे यांना देखिल सन्मानित करण्यात आले.
सुरभी संस्था ही रायगड जिल्हा व कोकणात कार्यरत असून, निसर्ग-पर्यावरण या विषयावर प्रामुख्याने गेली 12 वर्ष विविध मार्गाने काम करीत आहे. ग्रामीण भागामध्ये वनराई बंधारे बांधणे, पाणी सर्वेक्षण करणे, बीज संकलन करुन त्याचे रोपे तयार करणे व दरवर्षी ओसाड माळरानावर वृक्षारोपण करणे व झाडे जगविणे आदी उपक्रम जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये यांच्या सहकार्याने दरवर्षी राबविली जातात. विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यावरण रक्षणाचे प्रबोधन केले जाते. 7 जून 2015 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह संस्थेच्या वृक्षारोपण मोहिमेत सामिल झाले होते.
फटाके विरोधी अभियान व प्रदूषण मुक्त गांव व शाळा या अंतर्गत संस्था जिल्ह्यातील विविध गावांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहकार्याने घोषवाक्ये, पथनाट्याद्वारे रॅली काढून प्रबोधन केले जाते. अलिबाग, थळ, किहिम व इतर समुद्र किनारी दरवर्षी स्वच्छता मोहिम राबविली जाते. होळीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविले जाते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रायगड जिल्ह्यात सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले.
‘निसर्ग पर्यावरण मित्र 2020’ पुरस्काराने सुरभी स्वयंसेवी संस्था सन्मानित
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...