विद्यार्थीनी पनवेल तालुक्यातील धोदाणी येथील
कर्जत/प्रतिनिधी
पेण तालुक्यातील वरसई येथील घटना ताजी असताना कर्जत तालुक्यातील भालीवडी येथील शासकीय आश्रमशाळेमधील आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीने 9 फेब्रुवारीला विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या विद्यार्थीनीची प्रकृती स्थिर असून पनवेल कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहे.
कर्जत तालुक्यातील भालीवडी येथील शासकीय आदिवासी विश्रामशाळेत पनवेल तालुक्यातील धोदाणीवाडी येथील एक विद्यार्थीनी आठवी इयतेत शिकत आहे. त्या विद्यार्थीनीने 9 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता फिनेल पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शाळेतील कर्मचार्यांनी त्या विद्यार्थीनीला रात्री साडेआठ वाजता कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे रुग्णालय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी प्राथमिक उपचार करून पनवेल कळंबोली येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालय येथे हलविण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या विद्यार्थीनीची प्रकृती स्थिर असून या प्रकरणी शासकीय आश्रमशाळा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
मात्र, पेण तालुक्यातील वरसई येथील विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची याच आठवड्यातील घटना लक्षात घेता रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी भालीवडी शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला भोई आणि आदिवासी विकास विभागाचा पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आहे. त्याचवेळी कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
या प्रकरणाची माहिती घेतली असता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या विद्यार्थीनीला एक तरुण आला होता. भालीवडी आश्रमशाळेत दुपारच्या वेळी आलेल्या त्या तरुणाने काही खाद्यपदार्थ सोबत आणले होते. ही बाब आश्रमशाळेच्या अधीक्षक यांनी पाहिली असता त्यांनी त्यावेळी विद्यार्थीनीला दटावले. त्यामुळे सायंकाळी काळोख पडल्यानंतर स्वच्छता गृहातील फिनेलची बाटली शोधली आणि त्यातील फिनेल पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
परंतु अधीक्षक यांनी विद्यार्थीनीला दटावल्यानंतर नक्की काय झाले? याबाबत कोणतीही माहिती पुढे आली नाही .मात्र भालीवडी आश्रमशाळेत याबाबत चौकशी केली असता तेथील मुख्याध्यापिकेने आपले वडील भेटायला आले नाहीत म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती दिली आहे.
भालीवाडी आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचा आत्महत्येचा प्रयत्न
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...