दुबईहून आलेल्या क्रिकेटपट्टूंनी उपजिल्हा रूग्णालयात राडा घालून थेट गाठले घर
खारघर/मंगेश सूर्यवंशी
दुबई येथून क्रिकेट सामने खेळून परतलेल्या पनवेल आणि रायगडसह सातारा, कोल्हापूर परिसरातील त्या 25 जणांना आज महापालिकेने मुंबई अंधेरी विमानतळावरून पहाटेच ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची रवानगी खारघर येथील ग्रामविकास भवनात करण्यात येणार होती. परंतु प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्यात कोरोनाची लागण असल्याची कोणतीही लक्षणे नसल्याचे स्पष्ट होताच त्यांनी राडा करून घर गाठले.
जगभर कोरोनोच्या विषाणूने थैमान घातले आहे. त्याचे लोण महाराष्ट्रात परसरले असल्याने सगळीकडे कोरोनाची मानसिकता निर्माण झाली आहे. त्यातच कामोठे येथे दुबईहून परतलेल्या दोघांपैंकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे कस्तुरबा रूग्णालयात निष्पन्न झाल्याने भीतीचे सावट पसरले आहे.
दुबई येथे क्रिकेट खेळण्यास गेलेले पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली, उरण, महाड, पेण, सातारा, कोल्हापूरचे 25 तरूण परतणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना मिळताच, त्यांनी त्या तरूणांना अंधेरी विमानतळावरून सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ताब्यात घेण्यासाठी अलिशान लक्झरी पाठविली होती. त्यासाठी महापालिकेचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्या लक्झरीमध्ये 25 जणांना घेऊन पनवेल उपजिल्हा रूग्णालयात आणले. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली. प्राथमिक तपासणीत त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांना देखरेखीसाठी ख़ारघरच्या ग्रामविकास भवनात ठेवण्याचे ठरल्यानंतर संतापलेल्या क्रिकेटपट्टूंनी तिथे राहण्यास नकार दिला. अखेर त्यांनी राडा घातल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले पण काहीच फायदा झाला नाही.
दुबईहून आलेल्या क्रिकेटपट्टूंनी उपजिल्हा रूग्णालयात राडा घालून थेट गाठले घर
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...