परदेश वारीच्या प्रवाशांचा मुक्काम ‘इंडिया बुल्स’मध्ये
कोरोनाचे रूग्ण ठेवल्याच्या गैरसमजुतीमुळे कोन ग्रामस्थांनी केला विरोध
पनवेल/कांतीलाल कडू
राज्यात साथीरोग प्रतिबंधक अधिनियम लागू करण्यात आल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोन परिसरातील ‘इंडिया बुल्स’च्या तीन इमारती सक्तीने ताब्यात घेऊन त्याठिकाणी परदेश वारीहून परतणार्या प्रवाशांना देखरेखीखाली ठेवण्याचे नियोजन केले आहे. परंतु, कोन ग्रामस्थांचा, कोरोनो रूग्ण ठेवणार असल्याचा गैरसमज झाल्याने त्यांनी एकजुटीने विरोध केल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.
19 देशांसह भारतातही कोरोना विषाणूचे रूग्ण आढळून आले आहेत. पुणे आणि मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात त्यांच्यासाठी खास दालन तयार करण्यात आले आहे. दरम्यान कोरोनोबाधित रूग्णांची संख्या तीसहून अधिक असल्याने राज्यभर भीतीचे सावट पसरले आहे. त्यातच काल कामोठे येथील एका रूग्णाला कोरोनोची बाधा झाल्याचे कस्तुरबा रूग्णालयाने स्पष्ट केल्याने पनवेल तालुक्यात कोरोनाची धग तीव्र झाली आहे.
राज्य सरकारने काल ब्रिटिशकालीन कायद्याची अंमलबजावणी करून साथी रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधक अधिनियम अध्यादेश लागू केला. हा कायदा ब्रिटिश राजसत्तेत पुण्यात प्लेगची साथ आली त्यावेळी लागू करण्यात आला होता. त्याची पुनरावृत्ती आता ठाकरे सरकारने कोरोनाच्या धर्तीवर राज्यात केली आहे.
त्या आदेशाची अंमलबजावणी करताना, परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना अलिप्त ठेवण्यासाठी त्यांची राहण्याची स्वतंत्र्यरित्या व्यवस्था केली जात आहे. त्याकरीता रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी इंडिया बुल्सच्या तीन इमारती एका विशेष अधिकाराने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये 174 स्वेअर मीटरच्या एक हजार खोल्या आहेत. पुणे, मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या भारतीय नागरिकांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय तपासणीनंतर 14 दिवस सक्तीने इंडिया बुल्सच्या त्या खोल्यांमध्ये ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, आज सकाळीच कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, उपविभागीय अधिकारी दत्तू नवले, पनवेल महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे, तहसीलदार अमित सानप आणि तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत एमआयडीसीचे अभियंता राजू, अमोल मसुरकर, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. त्या खोल्यांमध्ये पाणी जोडणी करून देण्याची तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी परदेशी वारीहून आलेल्या प्रवाशांची राहण्याची आणि भोजनासह वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची व्यवस्था केली जाणार आहे.
दरम्यान, साथीरोग अटोक्या आणण्यासाठी रायगड जिल्हा अधिकार्यांनी इंडिया बुल्स आणि ग्रामविकास भवनाची यासाठी व्यवस्था केल्याचे घोषित केले आहे.
परदेश वारीच्या प्रवाशांचा मुक्काम ‘इंडिया बुल्स’मध्ये
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
धान्यात 'सरकारी भेसळ' पांढर्या तांदळाने गरिबांच्या पोटाला पडला ‘चिमटा’ पनवेल/निर्भीड लेख वृत्त सरकारी धान्यात मिसळण्यात आलेल्या कृ...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...