आधार’शी लिंक नसलेल्या रेशनकार्डधारकांना तहसीलदारांचा ‘आधार’
‘अशा’ रेशनकार्ड धारकांनी तहसीलदार किंवा संघर्ष समितीशी संपर्क साधावा
पनवेलः
लॉकडाऊनमध्ये अन्नधान्यांची तक्रार जोर धरू लागली आहे. शासकीय धान्य दुकानदारांकडून वाटप होणारे धान्य आणि सरकारी जाचक अटींमुळे काहींना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी आज, मंगळवारी (ता. 07) तहसीलदार अमित सानप यांना केलेल्या विनंती नंतर ‘आधार’शी लिंक नसलेल्या रेशनकार्डधारकांना धान्य वाटप करण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.
जीवनावश्यक वस्तूंमध्ये सध्या सरकारी धान्य तसेच प्राधान्याने पिवळ्या व केशरी कार्डधारकांना मिळणारे मोफत धान्य अद्याप दुकानदारांपर्यत पोहचले नसल्याने वाटप प्रक्रियेत थोडे अडथळे निर्माण झाले आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी पनवेलचे तहसीलदार अमित सानप, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार स्मिता जाधव तसेच 193 दुकानदारांना सुचना दिल्या आहेत, अशी माहिती सानप यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना दिली.
आजपर्यंत 103 दुकानदारांपर्यंत धान्य पोहचले आहे. ठेकेदार विनोद शेठ यांच्याकडे धान्य वाहतुकीसाठी दोन वाहनांची व्यवस्था होती. सानप यांनी त्यांच्याकडून 6 वाहनांची व्यवस्था करून घेतल्याने रेशनवरून अवघ्या दोन दिवसात धान्याचा पुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर सरकारच्या घोषणेनुसार मोफत धान्य देण्याची व्यवस्था होईल. ती फार मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल, असे कडू यांना सांगण्यात आले. शहरी भागातील नागरिकांसाठी 59 हजार तर ग्रामीण भागातील जनतेसाठी 44 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या परंतू आधारकार्डशी लिंक नसलेल्यांना ही सुवर्णसंधी आहे.
अनेक गावांतून, शहरांतून धान्य मिळत नसल्याबद्दल कांतीलाल कडू यांच्याकडे तक्रारी वाढल्याने त्यांनी सानप यांना रेशन धान्य यंत्रणा गतिमान करून नागरिकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी विनंती केली आहे. त्यानुसार सानप यांनी विशेष लक्ष देवून सर्व धान्य दुकानदारांना सुचना केल्या आहेत.
आधारकार्डशी लिंक नसलेल्या लाभार्थ्यांनी संपर्क साधावा!
आधार कार्डशी लिंक नसलेल्या लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य मिळत नसल्याने अनेकांची गोची झाली आहे. हजारो गरीब, गरजूंना अन्नधान्यावाचून वंचित राहवे लागल्याने त्यांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्याकडे कैफीयत मांडली. तेव्हा त्यांची ही अडचण तहसीलदार सानप यांना सांगून मार्ग काढण्याची विनंती केली होती. सानप यांनी अशा लाभार्थ्यांना धान्य देण्याची व्यवस्था करतो, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे त्या लाभार्थ्यांनी तहसीलदार पनवेल कार्यालय किंवा पनवेल संघर्ष समितीकडे व्हॉट्स ऍप क्रमांकः आनंद पाटील (8879464214), (सचिन पाटीलः 865234877), (स्वप्निल म्हात्रे 8976406116) (सुरज म्हात्रे 8652032875) यांच्याकडे अर्ज करावेत, असे आवाहन कांतीलाल कडू यांनी केले आहे. तसेच कोरोना परिस्थितीनंतर रेशनकार्ड आधारलिंक करून घेण्याची विनंतीही सानप यांनी केली आहे.
आधार’शी लिंक नसलेल्या रेशनकार्डधारकांना तहसीलदारांचा ‘आधार’
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...