अडीच हजार कामगारांची भोजन व्यवस्था
सिडकोच्या पुढाकाराने इस्कॉन संस्थेतर्फे सेवाभावी काम
नवी मुंबई/प्रतिनिधी
महामुंबई क्षेत्रात पनवेल येथे वेगात सुरू असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो आणि गृहनिर्माणसारख्या मोठ्या प्रकल्पांच्या कामावर काम करणार्या सुमारे अडीच हजार कामगारांची सिडकोने निवास तसेच भोजनाची व्यवस्था केली आहे. खारघर येथील इस्कॉन ही धार्मिक संस्था हे सेवाभावी काम करीत आहे.
टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक मजूर, कामगार काम सोडून गावाकडे परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांच्यापुढे प्रकल्पाच्या ठिकाणी राहण्याशिवाय पर्याय नाही. काही कामगार पायी चालत जाण्याचा पर्यायदेखील निवडत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधून गावाकडे जाणार्या शेकडो कामगारांना वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात निवारा देण्यात आला आहे. त्या ठिकाणी त्यांची जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सिडकोचे दक्षिण नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो आणि ९५ हजार घरे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांवर हजारो मजूर तसेच कामगार काम करीत आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणीच झोपड्या बांधून राहणार्या या कामगारांची होणारी उपासमार पाहता सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी खारघर मधील इस्कॉन या धार्मिक व सामाजिक संस्थेला विनंती करून हातावर पोट असलेल्या या मजुरांच्या दैनंदिन भोजनाची व्यवस्था केली आहे. सर्व प्रकल्पांवरील कामगारांची काळजी घेण्याचे आदेश कंत्राटदार व अधिकार्यांना दिलेले असून अडीच हजार कामगारांच्या दैनंदिन जेवनाची व्यवस्था इस्कॉन या संस्थेच्या माध्यमातून मार्गी लावली आहे.
अडीच हजार कामगारांची भोजन व्यवस्था
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...