ग्रामसडक योजनेची कामे सुरूच!
सोशल डिस्टन्सींगविनाच कामगारांचा पोलादपूर तालुक्यात वावर
पोलादपूर/प्रतिनिधी
तालुक्यातील गोवेले तसेच देवळे परिसरातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते आणि पुल आदी विकास कामे युध्दपातळीवर सुरू असून सोशल डिस्टन्सींग विनाच कामगारांचा पोलादपूर तालुक्यात वावर सुरू असल्याचे दृश्य या कामांवर दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील बोरजफाटा ते देवळे रस्ता हळदुळे दाभिळचा भाग असा सुमारे १.९२० किमी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू आहे. सदरचे काम पूर्ण करण्याची मुदत १८ एप्रिल २०२० पर्यंत नमूद केल्याने हे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र ग्रामविकास मंत्रालयाने १ कोटी ६० लक्ष १७ हजार रूपयांचे अर्थसहाय्य केले असून ग्रामसंधारण आणि जलसंधारण विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अलिबागमार्फत कार्यान्वयन केले जात आहे. याकामी महाड येथील एस. ए. शेठ हे कंत्राटदार कार्यरत आहेत. या कामात १.९२० किमी रस्ता डांबरीकरणासह असून १ छोटा पुल आणि २० पाईप मोर्यांची कामे अंतर्भूत आहेत.
गेल्यावर्षी ०७ मार्च २०२० पासून सुरू झालेल्या या कामादरम्यान, पावसाळयात एसटी प्रवासी वाहतुकीला अनेकदा डोंगरातील लालमातीमुळे रस्त्यावर चिखल आल्याने अडथळा निर्माण झाल्यानंतर वाहतुकीची क्षमता तपासून प्रवासी वाहतुक महाड आगाराने अनियमितरित्या सुरू ठेवली होती. त्यामुळे आता आगामी पावसाळ्यापूर्वी तातडीने हे काम पूर्ण करण्याकडे कंत्राटदाराचा कल असल्याने तसेच सदरचे काम पूर्ण करण्याची मुदत १८ एप्रिल २०२० पर्यंत असल्याने कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवरील संचारबंदी आणि आरोग्यविषयक दक्षता न घेता सोशल डिस्टन्सींग विनाच कामगारांचा वापर केला जात आहे.
ग्रामसडक योजनेची कामे सुरूच!
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...