प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र ‘बंद’
लॉकडाऊनचा फटका; रुग्णांना स्वस्त औषधे मिळेना
पेण/प्रतिनिधी
देशामध्ये लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा अंतर्गत येणारे दुकाने सोडली तर इतर सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. औषधांचे दुकाने मात्र या लॉक डाऊनमधून वगळण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जन औषधी केंद्रात अनेक प्रकारची औषधे स्वस्त दरात उपलब्ध होतात. परंतु पेण शहरात असलेले प्रधानमंत्री जन औषधी केंद्रालाही लॉक डाऊनचा फटका बसला आहे.
येथे उपलब्ध असलेली अनेक औषधे संपल्याने तसेच नवीन पुरवठा दिल्ली येथून न झाल्याने अखेर पेण शहरातील प्रधानमंत्री जन औषधी केंद्रालाही आपले औषधाचे दुकान बंद करावे लागले आहे. याचा फटका अनेक गरजू रुग्णांना बसला आहे. डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकाराचे रुग्ण व इतर अनेक प्रकारच्या रुग्णांना दररोज औषधे घ्यावी लागतात व त्यामुळे या रुग्णांना सर्वसामान्य मेडिकल स्टोअरमधून मिळणारे औषधे विकत घेण्यास परवडत नाहीत.
कारण मेडिकल स्टोअरमध्ये मिळणारे औषध व प्रधानमंत्री जन औषधी केंद्रात मिळणार्या औषधांच्या किमतीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. परंतु ही स्वस्त औषधे न मिळाल्याने अखेर या रुग्णांना महाग औषधे घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री जन औषधी केंद्रामध्ये लवकरात लवकर औषधांचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र ‘बंद’
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...